लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे विहार आणि तानसा धरण ओसंडून वाहू लागले आहेत. विहार मंगळवारी मध्यरात्री, तर तानसा बुधवारी पहाटे ओसंडून वाहू लागला. दरम्यान, सातही धरणांमध्ये ५८.९३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार तुळशी या सात धरणांमधून दररोज दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सातही धरणांमधील पाणीसाठा खालावल्याने आणि जूनमध्ये पावसाने ओढ घेतल्याने मुंबई महानगरपालिकेने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढू लागला आहे.

blob:https://www.loksatta.com/dcd4752f-4623-4674-9806-065e62232d41

हेही वाचा… आत्मपरीक्षण करा! अजित पवार यांचा काँग्रेसला टोला

सातपैकी तुळशी तलाव २० जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ २५ जुलै रोजी मध्यरात्री १२.४८ वाजता विहार, तर २६ जुलै रोजी पहाटे ४.३५ वाजता ओसंडून वाहू लागले. विहार धरणाची पाणी साठवणुकीची पूर्ण क्षमता ८०.१२ मीटर, तर तानसाची १२८.६३ मीटर इतकी आहे. विहारमध्ये २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर, तर तानसाध्ये १ लाख ४४ हजार ९४६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र अद्याप मुंबईकरांची पाणी चिंता मिटलेली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vihar and tansa dams have started overflowing due to heavy rains in mumbai print news dvr
Show comments