तरुण उद्योजिका म्हणून आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीस आलेल्या विहारी ज्वेलर्सच्या संचालिक विहारी सेठ यांना हिऱ्यांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिंगापूरहून त्यांनी कपडय़ातून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचे हिरे दडवून आणले होते. विहारी या प्रख्याक सियाराम सिल्क मिल्सचे संचालक अभिषेत पोद्दार यांच्या पत्नी आहेत.
विहारी सेठ या मंगळवारी सिंगापूर एअरलाईन्सने मुंबई विमानतळावर उतरल्या होत्या. त्यांच्याकडे तस्करी करून आणलेले हिरे असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभाग आणि महसूल संचलनालयाला मिळाली होती. ग्रीन चॅनलमधून जात असताना महसूल संचलनालयाने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या अत:र्वस्त्रात हे सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचे हिरे दडवल्याचे आढळून आले. दोन दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना गुरूवारी अटक करण्यात आली. विहारी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. विहारी यांचे सांताक्रुझ येथील ग्रॅंड हयात या पंचताराकिंत हॉटेलात विहारी ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानाला सिल करून महसूल संचलनालयाने ४ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांवर कर भरलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अशाप्रकारे किमान दहा वेळा दडवून दागिने तस्करी करून आणल्याची कबुली विहारी यांनी दिली आहे. अमेरिकेतून पदवीधर असलेल्या विहारी यांनी २०११ मध्ये सियाराम सिल्क मिल्सचे संचालक अभिषेक पोद्दार यांच्याशी विवाहबद्ध झाल्या होत्या.