देशातील १७ बॅंकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या विजय मल्ल्या यांच्याकडून कर्जाची वसुली करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्यांच्या मालमत्तेचा शनिवारी ऑनलाईन लिलाव ठेवला होता. मात्र एकाही खरेदीदाराकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा लिलाव अपयशी ठरला. त्यामुळे मल्ल्या यांच्या मालमत्तेचा सलग दुसरा ऑनलाईन लिलाव अपयशी ठरला असून मल्ल्या यांची मालमत्ता खरेदी करण्याकडे खरेदीदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते.
यावेळी किंगफिशरचा ‘फ्लाय द गुड टाईम्स’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या बोधचिन्हासह फ्लाईंग मॉडेल्स, फनलाईनर, फ्लाय किंगफिशर आणि फ्लाईंग बर्ड डिव्हाईस यांचा ऑनलाईन लिलाव शनिवारी ठेवण्यात आला होता. या मालमत्तेची किंमतही सुमारे ३६६ कोटी निश्चित करण्यात आली होती. शनिवारी एकाही खरेदीदाराने प्रतिसाद न दिल्याने तासाभरातच लिलाव संपला.
आणखी वाचा