‘सिरियल किलर’ विजय पालांडे याला काही वर्षांपूर्वी दिलेला जामीन उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. जामिनावरील सुटकेचा दुरुपयोग करीत पालांडेने पुन्हा खुनासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ताशेरे न्यायालयाने या वेळी ओढले.
खुनाच्या गुन्ह्यात झालेल्या शिक्षेला पालांडेने २००७ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी त्याने केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत त्याला ३० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला होता.
मात्र अरुणकुमार टिक्कू आणि करण कक्कड यांच्या हत्याकांडात पालांडे याला मुख्य आरोपी म्हणून अटक झाल्यानंतर त्याला यापूर्वी खुनाच्या प्रकरणात शिक्षा झाल्याची आणि उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची बाब उघडकीस आली होती.
आणखी वाचा