“महाराष्ट्र यंदा दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं पाणी, चारा टंचाई दिसताच १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असतानाही ट्रिपल इंजिन सरकार दुष्काळ जाहीर करण्याची धमक का दाखवत नाहीत,” असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच ट्रिपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जात असल्याचं म्हणत टोला लगावला.

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं १९५ तालुक्यांमध्ये जाहीर केला हे सांगत वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात ३५८ पैकी १९४ तालुके हे दुष्काळात येत असून १६ जिल्ह्यांमध्ये ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक प्रभावित भागात पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग (मध्य महाराष्ट्र) आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. सध्या मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीत गतवर्षीच्या ९६.७५ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ ३४.५२ टक्के पाणीसाठा आहे.”

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण

“ट्रिपल इंजिन सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचं काही पडलेलं नाही”

“पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या उजनीमध्ये गेल्या वर्षीच्या १०० टक्क्यांच्या तुलनेत केवळ २३.६५ टक्के पाणीसाठा आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक महसूल विभागातील धरणांमध्ये ६८.१२ टक्के, औरंगाबाद विभागात ३२.४५ टक्के आणि पुणे विभागात ७२.८७ टक्के पाणीसाठा आहे. बळीराजा अडचणीत आला असून महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांचं काही पडलेलं नाही,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा : VIDEO: “काँग्रेसने एकदाचं जाहीर करावं की ते आंबेडकरवादाच्या विरोधात…”; वंचितचा हल्लाबोल

“महाराष्ट्र सरकार झोपलंय का?”

“शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही, कर्जाचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. मग, महाराष्ट्र सरकार झोपलंय का? असा प्रश्न वडेट्टीवारांनी विचारला. “सर्वसामान्यांचं सरकार म्हणून थापा मारणारे मुख्यमंत्री निष्क्रिय आहेत. एक उपमुख्यमंत्री राजस्थान निवडणूक प्रचारात व्यग्र आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या खात्यांच्या बैठका घेऊन स्वतःच्या आमदारांसाठी निधी पळवण्यात व्यग्र आहेत. हे सरकार स्वतःच्या कामात मश्गूल आहे. दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना त्याच्याकडे या सुस्त सरकारचं लक्ष कधी जाणार? असा प्रश्न करत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

Story img Loader