मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून विर्लेपार्ले मतदारसंघात रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, विमानतळालगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन, पुनर्विकासातील विमानतळ फनेल झोनचा अडसर आणि वाहतूक कोंडी या समस्या ‘जैसे थे’ आहेत. या समस्या सोडविण्यात येत नसल्याने येथील मतदार नाराज आहे. त्यामुळे आता तरी निवडून येणाऱ्या उमेदवाराने या समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊले उचलावित आणि विर्लेपार्ले परिसराचा सर्वांगीण विकास साधावा, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

विर्लेपार्ले मतदारसंघ मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ असून नेहमीप्रमाणे यावेळीही या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. २०१४ आणि २०१९ असे सलग दोनदा विजयी झालेल्या पराग अळवणी यांनाच यावेळी भाजपने येथून उमेदवारी दिली आहे. यावेळी पराग अळवणी यांच्याऐवजी विर्लेपार्ल्यात नवीन चेहऱ्याला संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र भाजपने अळवणी यांची उमेदवारी जाहीर करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. अळवणी यांच्याविरोधात शिवसेनेने (उद्धव ठाकरे) माजी नगरसेवक संदीप राजू नाईक यांनी उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी मनसेने जुईली शेंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मतदारांचा समावेश आहे. येथे मराठी आणि गुजराती टक्का अधिक असून हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मानला जातो. असे असले तरी संदीप नाईक आणि जुईली शेंडे यांचे आव्हान अळवणी यांच्यासमोर आहे. या मतदारसंघात अनेक समस्या असून यापैकी काही महत्त्वाच्या समस्या आजतागायत सोडविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथील मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

Gajendra Shekhawat criticized Mahavikas Aghadi government for increased corruption and halted projects
मविआ सरकारमुळे राज्याला आजही दुष्परिणाम भोगावे लागताहेत, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टिका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Belapur vidhan sabha election
गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत
Bawankule called meeting to make history in deoli assembly constituency
कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’
whom will saved by Division of votes in Vikhroli constituency
विक्रोळी मतदारसंघामध्ये मतांचे विभाजन कोणाला तारणार
bjp president jp nadda
पंतप्रधानांचे राजकारण विकासाभिमुख; भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?
maharashtra vidhan sabha election 2024 pune assembly constituency bjp brahmin jodo
‘कसब्या’तील धड्यातून पुण्यात भाजपचे ‘ब्राह्मण जोडो’

हेही वाचा : मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या

या परिसरात मोठ्या संख्येने झोपड्या असून झोपड्यांचे पुनर्वसन काही ना कारणाने रखडले आहे. तर दुसरीकडे विमानतळालगतच्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे या परिसर विमानतळ फनेल झोनमध्ये येतो. त्यामुळे येथे इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहे. या मर्यादेमुळे येथील इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसत आहे. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी सातत्याने मतदारांकडून केली जात आहे. सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अळवणी यांनी मतदारसंघात कामे केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याचवेळी महत्त्वाच्या अशा समस्या सुटल्या नसल्याचेही चित्र आहे. विमानतळ फनेल झोनचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखात्यारित आहे. असले तरी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही हा प्रश्न का निकाली लागत, नाही असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही विमानतळ फनेल झोन, रखडलेल्या झोपु योजना, इमारतींचा रखडलेला पुनर्विकास हेच मुद्दे केंद्रस्थानी आहेत. या मुद्द्यांसह सध्या विर्लेपार्ले मतदारसंघात वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग, तसेच विर्लेपार्ले परिसरातील अतंर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीने नागरिक, प्रवासी – वाहनचालक हैराण आहेत.

हेही वाचा : बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

विर्लेपार्ले मतदारसंघातील या समस्या सोडविण्याची मागणी मतदारांकडून केली जात आहे. मात्र त्याचवेळी येथे कोण बाजी मारणार हा प्रश्नही उपस्थित होत आहे. या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. २०१४ मध्ये ३२ हजारांहून अधिक तर २०१९ मध्ये ५८ हजारांहून अधिक मतांनी अळवणी विजयी झाले होते. भाजपसाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. असे असले तरी आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. दोन मोठे पक्ष फुटले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे पराग अळवणी तिसऱ्यादा बाजी मारणार की महाविकास आघाडी काही बदल घडविणार याचे उत्तर मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.