राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेतर्फे पनवेलमध्ये झालेल्या मराठा आरक्षण इशारा महामेळाव्यात मेटे यांनी त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे, भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, यांच्यावर जोरदार टीका
केली.
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात पुढाकार घेतल्याने त्यांचा स्मारक बांधण्यातील अनुभव वाढत आहे. शिवसेनाप्रमुख राज्याला वंदनीय होते. त्यामुळे त्यांचे स्मारक हे झालेच पाहिजे पण गेली अनेक वर्षे रखडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होण्यासाठीही आता पवार यांनी जबाबदारी घ्यावी, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी पवार यांना पनवेल येथील कार्यक्रमात दिले. मराठा आरक्षणासाठी ११ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा नेला जाणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांचे स्मारक उभारण्यात पुढाकार घेतला नाही तर ते होणार नाही अशी शंकाही मेटे यांनी व्यक्त केली. नाशिक मध्ये उद्योग मंत्री नारायण राणे यांची मराठा आरक्षण समिती गेली असता त्याला भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे. विरोधाची निवेदने भुजबळ फार्म हाऊसवरुन गेल्याची माहिती देखील मेटे यांनी या जाहीर सभेत दिली. त्यामुळे या भुजबळांना मराठा समाजाने जागा दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन मेटे यांनी यावेळी केले.
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे तर एक नंबरचे दुटप्पी आहेत. बीड मध्ये हेच मुंडे मी मराठा समाजाचा असल्याचे सांगतात आणि पुण्यात मात्र मराठा आरक्षणाच्या विरोधात मोर्चा आयोजित करण्याचे षडयंत्र रचत असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा