अंधेरी पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला असून त्यांचे मी आभार मानतो, असे म्हणाले.
हेही वाचा – मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”
नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?
“हा निर्णय घेतल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मी आभार मानतो. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाले असेल आणि त्यांच्या कुटुंबीय पोटनिवडणूक लढवत असेल, तर ती निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आपली खऱ्या अर्थाने संस्कृती आणि पंरपरा राहिली आहे. मात्र, दुर्दैवाने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीपासून आता अंधेरीच्या निवडणुकीपर्यंत या पंरपरेला खंड पाडल्या गेला”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा – ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’प्रमाणे मुख्यमंत्री शिंदेंचा वापर, ‘सामना’मधून गंभीर आरोप, म्हणाले “गोडसेप्रमाणे शिंदे…”
“आज देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर पदाधिकारी हे जुनेजाणते नेते आहेत. त्यांच्या मनात कोणी संभ्रम निर्माण केला असेल आणि त्यातून भाजपाने हा उमेदवार दिला असेल, तर ते योग्य नाही. आम्ही आज जनतेत फिरत असताना लोकांमध्ये चीड असल्याचे दिसून येत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी जे आवाहन केले आहे, त्याचा देवेंद्र फडणवीसांनी विचार करावा”, असेही विनायक राऊत म्हणाले.