समग्र विंदादर्शनाची संधी एकाच जागी

मुंबई, कविता, वैचारिक लेखन, समीक्षा अशा विविध प्रांतांत मुक्त संचार करून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांचे, त्यांच्या समृद्ध साहित्याने परिपूर्ण असे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील चेतना महाविद्यालयात साकारणार आहे. विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षांची सांगता २३ ऑगस्ट २०१८ रोजी होत आहे. या तारखेपर्यंत विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी पूर्ण करण्याचा  विंदा करंदीकर स्मारक समिती आणि चेतना महाविद्यालय यांचा मानस आहे. विंदा करंदीकर स्मारक समितीमध्ये विजया राजाध्यक्ष, रामदास भटकळ, सुषमा पौडवाल हे सदस्य आहेत.

Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

विंदा करंदीकरांच्या स्मृती जागवणाऱ्या या स्मारकात विंदांना मिळालेली सन्मानचिन्हे, पारितोषिके, मानपत्रे, तसेच त्यांची छायाचित्रे व जीवनपट, हस्तलिखिते, त्यांच्या वापरातील लेखनसाहित्य व संबंधित वस्तू, विंदा करंदीकरांचे प्रकाशित साहित्य यांचा या स्मारकात समावेश असेल. अभ्यासकांसाठी विंदांच्या साहित्याची समीक्षा करणारी पुस्तके, लेख, त्यांच्या मुलाखती या स्मारकात उपलब्ध असतील. विंदांविषयीचे दृक्-श्राव्य माध्यमातील साहित्यदेखील येथे असेल. जिज्ञासूंना ते पाहण्यासाठी संगणक व टीव्ही उपलब्ध असेल. विंदांच्या साहित्याच्या अभ्यासाचे एक केंद्र म्हणून हे स्मारक विकसित करण्यात येईल.

सध्या चेतना महाविद्यालयाच्या ‘मनसुखलाल छगनलाल ग्रंथालया’त विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र दालन तयार करण्यात येणार आहे. येत्या काही वर्षांतच चेतना महाविद्यालयाच्या उभ्या राहणाऱ्या नव्या वास्तूत या राष्ट्रीय स्मारकासाठी स्वतंत्र जागा राखून ठेवण्यात येणार आहे.

विंदा करंदीकर वांद्रे पूर्व येथील ज्या ‘साहित्य सहवास’ गृहसंकुलात वास्तव्यास होते, तेथून चेतना महाविद्यालय अगदी जवळ असून १९७० साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाचे ग्रंथालय अत्यंत समृद्ध आहे. मराठीतील ज्येष्ठ कवी अरुण कोलटकर यांनी त्यांच्या पुस्तकसंग्रहातील सुमारे २०० दुर्मीळ पुस्तके या ग्रंथालयाला भेट दिली आहेत. अँग्लो-इंडियन साहित्याचे अभ्यासक डॉ. के. आर. महिषी यांची सुमारे दोन हजार दुर्मीळ पुस्तके या ग्रंथालयामध्ये आहेत. दुर्मीळ पुस्तकांचा एक वेगळा विभागच या ग्रंथालयात आहे. विंदांसह साहित्य सहवासातील य. दि. फडके, म. वा. धोंड, विजया राजाध्यक्ष, के. ज. पुरोहित इत्यादी अनेक साहित्यिकांचा या ग्रंथालयात राबता असे.

स्मारकाच्या उभारणीसाठी विंदांचे पुत्र उदय करंदीकर यांनी करंदीकर कुटुंबीयांच्या वतीने नुकताच पाच लाख रुपयांचा धनादेश चेतना महाविद्यालयाकडे सुपूर्द केला आहे.

विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकातर्फे दरवर्षी साहित्य व संस्कृती यांविषयीची व्याख्यानमाला, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. ज्ञानपीठ विजेत्या राष्ट्रीय पातळीवरील लेखकाचे व्याख्यान आयोजित केले जाईल. त्याचबरोबर तरुण पिढीत साहित्याची रुची निर्माण व्हावी यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्याच्या योजना विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकाने आखल्या आहेत. चेतना महाविद्यालयातर्फे स्मारकाचे हे सगळे उपक्रम राबवण्यात येतील.

विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकामध्ये विंदांशी संबंधित वस्तू व पुस्तके, दस्तऐवज इत्यादी गोष्टी ठेवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींकडे विंदांची छायाचित्रे, पत्रे, हस्तलिखिते, मुलाखती व व्याख्यानांच्या, कवितावाचनाच्या दृक्-श्राव्य प्रती असतील त्या त्यांनी या स्मारकाकडे सोपवाव्यात, ज्यामुळे हे स्मारक अधिक समृद्ध होईल, असे आवाहन विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकातर्फेकरण्यात आले आहे. या संदर्भात संबंधितांनी विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारकाचे समन्वयक डॉ. नितीन रिढे यांच्याशी ७७३८३१६२६२ किंवा neegrind@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभ्यासकांसाठी हे स्मारक खासच!

१९६६ ते २०१० इतका प्रदीर्घ काळ विंदांनी साहित्य सहवासमध्ये घालवला. विंदांची साहित्यिक कारकीर्द बहराला आली ती याच साहित्य सहवासात! चेतना कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव चौधरी आणि विंदांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. विंदांचं चेतना महाविद्यालयाच्या ग्रंथालयाशी एक वेगळं नातं जोडलं गेलं होतं. चेतना महाविद्यालयाचे ग्रंथालय हे एक प्रकारे साहित्य चर्चेचे केंद्र राहिलेले आहे. अशा ठिकाणी विंदांचे स्मारक होणे उचित ठरेल, या भावनेतूनच स्मारक समितीमधील सदस्य सुषमा पौडवाल तसेच अन्य सदस्य व करंदीकर कुटुंबीयांनी विंदाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी एकमताने चेतना महाविद्यालयाची निवड केली. चेतना संस्थेचे सचिव आणि मधुकरराव चौधरी यांचे पुत्र शिरीष चौधरी यांनाही ही सूचना रास्त वाटली व स्मारकाच्या उभारणीचा मार्ग सुकर झाला. विंदाप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे स्मारक उपयुक्त ठरेल.   – उदय करंदीकर, विंदा करंदीकर स्मारक समितीचे निमंत्रक आणि विंदांचे पुत्र.

ते आमच्या परिवारातीलच!

माझे वडील मधुकरराव चौधरी आणि कला नगरमधील साहित्यिक, कलावंत यांचे स्नेहाचे संबंध होते. विंदा तर त्यांचे खासच! विंदा संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत. ते आमच्या परिवारातील एक सदस्यच होते. त्यांच्या मुलाने या स्मारकाची कल्पना मांडली तेव्हा इतक्या मोठय़ा साहित्यिकाचं स्मारक साकारण्याची संधी आपल्याला मिळतेय ही भावनाच खूप मोठी होती. या भावनेतूनच हे स्मारक आमच्या संस्थेत साकारायचे, असे आम्ही ठरवले. समाजातील अशा आदरणीय व्यक्तींसाठी आपल्याकडून जमेल ती मदत करावी, असे मला वाटते. – शिरीष चौधरी, चेतना संस्थेचे सचिव

Story img Loader