‘… यापेक्षा परदेशात जाऊन राहणे चांगले’, यासारखे वक्तव्य सुरेश वाडकर यांच्यासारख्या गायकाने करू नये, त्यांच्याकडून अशी भूमिका अपेक्षित नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मुंबईमध्ये दिली. 
नाशिक शहरातील जमीन खरेदीत आपली फसवणूक होण्याच्या प्रकरणात शासकीय यंत्रणेचे अधिकारीही सामील आहेत, असा आरोप करीत सुरेश वाडकर यांनी यापेक्षा परदेशात जाऊन राहणे चांगले, अशी भावना नाशिकमध्ये व्यक्त केली होती. आपल्यासारख्या व्यक्तीला अशा प्रकारे लुटण्याचा प्रकार होत असेल तर, सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी वाडकरांकडून अशी भूमिका अपेक्षित नसल्याचे सांगितले.
आपण या प्रकरणाची माहिती घेत आहोत, असेही तावडे म्हणाले.

Story img Loader