जागेची प्राथमिक निश्चिती; समितीकडून घरांची निवड सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘पुस्तकाचे गाव’ ही सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतील योजना महाबळेश्वरजवळील भिलारमध्ये लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत जागेची प्राथमिक निश्चिती करण्यात आली असून, गावातील ५० घरांची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील अंतिम १५ ते २० घरे नेमलेली समिती ठरवणार आहे. त्यामुळे महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना साहित्याचा आनंद घेता येईल.

या संदर्भात २४ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ही योजना येत्या काही महिन्यांत कशी सुरू करता येईल याबाबत सूचना करण्यात आल्या. सध्या त्याबाबतच्या समितीमार्फत भिलारमध्ये काम सुरू असल्याचे  स्पष्ट करण्यात आले. महाबळेश्वरजवळचे भिलार हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे पुस्तक गाव विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई बुक्स व ऑडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची हजार पुस्तके ठेवली जाणार असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले जाणार आहे. इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ याच्या धर्तीवर असे गाव विकसित करण्याची ही योजना आहे. त्याबाबत नेमलेल्या उपसमितीकडून कामांचा आढावा घेतला जात आहे. किमान निवडलेल्या काही घरांमध्ये तरी या योजनेची सुरुवात करावी असा तातडीचा प्रयत्न असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागांवर (उदा-ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करणार

  • भिलार गावातील काही घरांची निवड
  • पर्यटन विभागाच्या न्याहरी
  • निवास योजनेनुसार ही निवड
  • निवडलेल्या घरांना न्याहरी
  • निवास व पुस्तकांच्या विक्रीची संधी
  • या घरांना पायाभूत सुविधा पुरवल्या जातील.
  • २० प्रकारच्या साहित्याची पुस्तके उपलब्ध