व्हिंटेज कार शौकिनांसाठी एक खुशखबर आहे. व्हिंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (व्हीसीसीआय) आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन (डब्लूआयएए) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ डिसेंबर रोजी पुणे येथे व्हिंटेज कार फिएस्टाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २० डिसेंबपर्यंत आपल्या प्रवेशिका आयोजकांकडे पाठवायच्या आहेत. या प्रवेशिका वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनच्या पुणे येथील कार्यालय तसेच व्हिंटेज अ‍ॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या मुंबईतील कार्यालयात भरून द्याव्यात, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यशस्वी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी नीतू प्रेमन यांच्याशी ९१६७४४४०९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.    

Story img Loader