मुंबई : महारेरा क्रमांक नमूद करूनच गृहप्रकल्पाची जाहिरात आणि घरांची विक्री करणे विकासकांना बंधनकारक असताना अनेक विकासक त्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महारेराने अशा १९७ विकासकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

‘रेरा’ कायद्यानुसार ५०० चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळावरील किंवा आठ सदनिकांच्या कुठल्याही प्रकल्पाची (यात प्लॉट्सचाही समावेश) महारेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. रेरा नोंदणी क्रमांकाशिवाय विकासकाला प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात, त्या प्रकल्पातील घरांची नोंदणी, विक्री करता येत नाही. मात्र, काही विकासक या नियमाकडे काणाडोळा करून महारेरा नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिराती प्रसिद्ध करीत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे.

Due to delayed promotions and lack of qualified officers 4 chairpersons handle 40 297 pending caste certificate cases in 36 districts
जात पडताळणीची ४० हजार प्रकरणे प्रलंबित, केवळ चारच जणांकडे ३६ जिल्ह्यांचा कार्यभार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Commissioner Dr Indurani Jakhar instructed department heads to set office hours for listening to citizens complaints
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
will bring postal stamps books and plays on chhatrapati tararani maharani says bjp minister ashish shelar
ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा
nashik special campaign for provide electricity connections to Zilla Parishad owned Anganwadi
७४२ अंगणवाड्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा, विशेष मोहिमेतंर्गत कार्यवाही
maharera pune latest news in marathi
‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती

 या प्रकाराची महारेराने गंभीर दखल घेतली असून, अशा प्रकल्पांविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. राज्यातील अशा १९७ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या असून, त्यापैकी ९० विकासकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीअंती एकूण १८ लाख ३० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी ११ लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित प्रकल्पांविरोधातील पुढील कार्यवाही सुरू आहे. या सुनावणीदरम्यान अनेक विकासकांनी नोंदणी क्रमांक असतानाही तो जाहिरातीत नमूद केलेला नाही, तर काही विकासकांनी लहान अक्षरात तो नमूद केल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईतील ८२ प्रकल्पांचा समावेश

‘महारेरा’ने नोटीस बजावलेल्या १९७ पैकी सर्वाधिक ८६ प्रकल्प पुण्यातील आहेत. त्याखालोखाल मुंबईतील ८२ प्रकल्प, तर नागपूरमधील २९ प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. मुंबई क्षेत्रातील ५२, पुणे क्षेत्रातील ३४ आणि नागपूर क्षेत्रातील ४ विकासकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित १०७ विकासकांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे.

Story img Loader