शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्या १ जुलै रोजी मुबंईतून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारविरोधातील हा मोर्चा आहे. दरम्यान, भाजपाने आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १५० जागांचा नारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या शिवसेना (ठाकरे) आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आहे. एकीकडे भाजपाचे आव्हान असताना दुसरीकडे त्यांना मित्रपक्षाचीच अडचण होणार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर आपली पकड घट्ट राहावी याकरता ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा भाजपा हटाव, मुंबई बचाव मोर्चा असल्याचं ठाकरे गटाने सांगितलं आहे. ठाकरे गटाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपाकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तोफ डागण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा