मुंबईतून हिंदू जनजागृती समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे पोलिसांच्या तावडीत
अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी मुंबईतून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. तीन वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडावरून झालेली ही पहिलीच अटक असून या प्रकरणाच्या संथगती तपासाबद्दल न्यायालय तसेच माध्यमांमधून यंत्रणेवर जोरदार टीका होत होती.
डॉ. तावडे याला शुक्रवारी दुपारी सीबीआय कार्यालयात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता त्याला अटक झाली. शनिवारी पुणे येथील सीबीआय न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे.
डॉ. तावडे हा सनातन संस्थेच्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे. सीबीआयने गेल्या बुधवारी, १ जूनला पनवेल येथील डॉ. तावडे याच्या तसेच पुणे येथील सारंग अकोलकर याच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे हस्तगत केली होती तसेच त्यांना काही भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेलही मिळाले होते. या दोघांसह सर्व फरारी संशयितांना अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी पुण्यात दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेत केली होती. त्याच दिवशी सीबीआयने डॉ. तावडे याची कसून चौकशी केली होती. हत्या झाली त्या दिवशी आपण कुठे होतो, हे तावडेने सांगितले, मात्र त्याच्या मोबाइल लोकेशनवरून त्यात विसंगती आढळत होती. काही संशयित व्यक्तिंशी असलेल्या संपर्काबाबतही त्याला खुलासा करता आला नव्हता.
डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आल्यानंतर ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप होत होता. २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अटक झालेल्या ‘सनातन’च्याच समीर गायकवाड या साधकाच्या चौकशीतूनही दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, याची छाननी सुरू होती.

संघाशी जवळीक?
डॉ. वीरेंद्र तावडे हा मूळ कोकणचा असल्याचे समजते. कोकण येथील देवगड तालुक्यातील डॉ. तावडे याची पत्नीही वैद्यकीय व्यवसायामध्ये लोधिवली येथील एका रुग्णालयात होती. वैद्यकीय सेवेत असल्यापासून
डॉ. तावडे याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक होती. पनवेल येथील कल्पतरू गृहनिर्माण सोसायटीत त्याची सदनिका असून तेथेच सीबीआयने गेल्या आठवडय़ात छापा घातला होता. सनातन संस्थेचा पनवेल येथे आश्रम असून त्या आश्रमातही तावडे याची बरीच ये-जा होती.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून