राज्य विश्वकोश मंडळाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने येत्या १ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित आले आहे.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी विश्वकोशातील नोंदींचे वाचन करणार असून ‘आपला विश्वकोश’ हा लघुपटही या वेळी दाखविण्यात येणार आहे. याचे निवेदन अभिनेत्री रिमा यांचे आहे. विश्वकोशात ज्येष्ठ शास्त्रज्ञडॉ. जयंत नारळीकर, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड, अभिनेते सुबोध भावे यांच्यावर चित्रित झालेले विश्वकोशाचे अभिमान गीत याचा समावेश आहे. हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून संगीत अशोक पत्की यांचे आहे.
कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे ध्वनिचित्रमुद्रित भाषण दाखविण्यात येणार आहे. डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधवी पेठे यांच्या हस्ते विश्वकोशाच्या १३ व्या खंडाच्या इंटरनेट आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत डहाणूकर महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.       

Story img Loader