सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कमल हासन यांचा ‘विश्वरुपम’ मुंबईत सर्वत्र झळकला असला तरी मुंबईकरांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम संघटनांचा असलेला विरोध लक्षात घेऊन कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या चित्रपटासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची कसून तपासणी केली जात होती.
‘विश्वरुपम’ चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी काही मुस्लिम संघटनांनी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांची भेट घेतली. बंदी घालण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे स्पष्ट करीत आयुक्तांनी बंदीची मागणी फेटाळून लावली. न्यायालयातून बंदी आदेश आणला तरच त्याची अमलबजावणी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शनिवारी व रविवारी प्रेक्षकांची संख्या अधिक असते, असे काही चित्रपटगृह चालकांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ३० ते ४० टक्के प्रक्षेकांनी आगावू तिकिटांची खरेदी केली आहे. दरम्यान, विश्वरुपम प्रदर्शित झालेल्या चित्रपटगृह, मल्टिप्लेक्सबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे आयुक्तांचे प्रवक्ते व उपायुक्त अंबादास पोटे यांनी सांगितले.
cap
कडेकोट पोलीस बंदोबस्तात लागलेला चित्रपट विश्वरूपमला मुंबईच्या प्रेक्षकांचा थंडा प्रतिसाद लाभला
‘विश्वरुपम’ला थंड प्रतिसाद
सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कमल हासन यांचा ‘विश्वरुपम’ मुंबईत सर्वत्र झळकला असला तरी मुंबईकरांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. मुस्लिम संघटनांचा असलेला विरोध लक्षात घेऊन कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 02-02-2013 at 02:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwaroopam opens to poor response