शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. उद्या बहुमत चाचणी होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हं दिसत आहेत. अशा स्थितीत मविआ सरकारकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक नुकतच जारी करण्यात आलं आहे.

विवेक फणसळकर यांनी ३१ मार्च २०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तलायात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.

(सविस्तर बातमी अपडेट होत आहे…)

Story img Loader