ग्राहकांना तापदायक ठरणारे जाहिरातींचे कॉल्स न थांबविल्याबद्दल एका डॉक्टरला २० हजार रुपये नुकसानभरपाई व पाच हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचे आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकतेच दिले आहेत. नानाविध सल्ले देणाऱ्या कॉल्समुळे त्रस्त झालेल्या मुलुंड येथील डॉ. आशिष गाला यांनी आपला दूरध्वनी कॉल लिस्टमध्ये नोंदवू नये आणि जाहिरातींचे कॉल्स आपल्याला येऊ नयेत, अशी सूचना व्होडाफोनला केली होती. तसे केले जाईल, असे आश्वासन व्होडाफोनने देऊनही हे कॉल्स सुरू राहिल्याबद्दल डॉक्टरांनी ३० ऑगस्ट २००८ रोजी जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती. ग्राहकाच्या तक्रारीनंतर त्याचे निवारण करण्यासाठी कंपनीला १५ दिवसांची मुदत आवश्यक असते. जाहिरात कॉल सुरू राहणे, ही सेवा पुरविण्यातील त्रुटी नाही, असा बचाव व्होडाफोनने केला होता. पण तो फेटाळला गेला. नियमानुसार ग्राहकांना योग्य सेवा न पुरविल्याचा ठपका राज्य मंचाने व्होडाफोनवर ठेवला आहे.
व्होडाफोनला भरपाईचे आदेश
ग्राहकांना तापदायक ठरणारे जाहिरातींचे कॉल्स न थांबविल्याबद्दल एका डॉक्टरला २० हजार रुपये नुकसानभरपाई व पाच हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचे आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकतेच दिले आहेत. नानाविध सल्ले देणाऱ्या कॉल्समुळे त्रस्त झालेल्या मुलुंड येथील डॉ. आशिष गाला यांनी आपला दूरध्वनी कॉल लिस्टमध्ये नोंदवू नये आणि जाहिरातींचे कॉल्स आपल्याला येऊ नयेत, अशी सूचना व्होडाफोनला केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2013 at 02:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vodafone to pay compensation to doctor