मुंबई : महामुंबईतील लक्षवेधी ठरलेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांच्यात थेट लढत झाली असून ही अटीतटीची लढत जिंकण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रचारात साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर उपयोग केला. दोन्ही उमेदवारांनी आपल्या मतपेढीवर विशेष लक्ष केंद्रित करीत भाषा आणि धार्मिक वळणावर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलुंड आणि शिवाजीनगर मानखुर्दमधील मतदारांच्या कौलावरच ईशान्य मुंबईतील निकालाचे गणित ठरणार आहे.

हेही वाचा >>> डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपी डॉक्टरांना दोषमुक्त करण्यास विशेष न्यायालयाचा नकार

Katol, Saoner, salil Deshmukh, Ashish deshmukh,
विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pm modi rally Kharghar
खारघर मोदीमय! भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Phulumbri Assembly Constituency Assembly Election 2024 Challenge to BJP in Haribhau Bagde constituency
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

निवडणूक लोकसभेची असली तरी दोन्ही उमेदवारांनी कांजूरमार्ग आणि शिवाजीनगरमधील क्षेपणभूमी, प्रदूषण, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, रेल्वे टर्मिनस या स्थानिक मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रित केला होता. धारावीकरांचे आणि मुंबईतील प्रकल्पबाधितांचे मुलुंडमधील पुनर्वसन हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरला. महाविकास आघाडीच्या संजय पाटील यांनी याच मुद्द्यांवरून भाजपला खिंडीत पकडले, तर शिवाजीनगर मानखुर्दमधील अमली पदार्थांचा अड्डा आणि तेथील तस्करांना संपविण्याची तसेच मानखुर्दचे शिवाजीनगर असे नामांतर करण्याची घोषणा करीत एकीकडे गुजराती मतदारांना खूूश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी त्यांनी मुस्लीम मतदारांचा रोष ओढवून घेतला. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका आणि विविध भाषिक केंद्रीय मंत्र्यांना या मतदारसंघात फिरवून गुजराती-मारवाडी, उत्तर भारतीयांसोबतच मनसे आणि शिंदे गटाच्या माध्यमातून मराठी विशेषत: कोकणी मते मिळविण्याचा प्रयत्न केला. तर ठाकरे गटाने मराठी विरुद्ध गुजराती, भाजप विरुद्ध मुस्लिम, भाजप विरुद्ध दलित आणि निष्ठावंत विरुद्ध गद्दार या पद्धतीने आपल्या विजयाची रणनीती आखली होती.

हेही वाचा >>> घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण: जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेला अटकपूर्व जामीन देण्यास नकार

यंदा या मतदारसंघात ९ लाख २२ हजार ७६० म्हणजेच ५६.३७ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधित मतदान भाजपचा गड समजला जाणाऱ्या मुलुंडमध्ये ६१.३३ (१ लाख ७९ हजार) टक्के झाले आहे. घाटकोपर पूर्वमध्ये एक लाख ४१ हजार(५७.८५ टक्के) आणि मोदींचा रोड शो झालेल्या घाटकोपर पश्चिममध्ये झालेल्या दीड लाख (५५.९० टक्के) मतदानावर भाजपची सारी मदार आहे. शिवाजीनगर मानखुर्दमध्ये एक लाख ५६ हजार (५०.४८ टक्के) मतदान झाले असून भांडुप पश्चिममध्ये एक लाख ६३ हजार (५८.५३ टक्के) आणि विक्रोळीतील एक लाख २९ हजार (५४.४५ टक्के) मतदानावर संजय पाटील यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. सुरुवातीस भाजपसाठी सोप्या ठरलेल्या या लढतीने अखेरच्या टप्प्यात विरोधकांनी भाजपला जेरीस आणले.