लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी ५२.६९ टक्के, तर उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांमध्ये सरासरी ५५.६६ टक्के मतदान झाले. मतदानाची सरासरी टक्केवारी ६० टक्क्यांपर्यंतही पोहोचली नसली तरी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये मतटक्का वाढलेला आहे. मात्र उपनगरांतील चांदिवली आणि अणुशक्तीनगर या मतदारसंघांचा अपवाद आहे.

mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
confusion names voters Koparkhairane, Koparkhairane,
२५० मतदारांच्या नावांचा घोळ; कोपरखैरणेत नावे वगळणे, भलत्या मतदान केंद्रात नाव गेल्याचे प्रकार, तक्रार दाखल
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढे आली. त्यानुसार मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. यावेळी मुंबई महापालिकेने मतदानासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवली होती व विशेष सुविधाही दिल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. मतदारांच्या रांगा कुठेही दिसल्या नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साह नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गुरुवारी संध्याकाळी उशीरापर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ लागली. त्यानुसार २०१९ च्या मतटक्क्याच्या तुलनेत मतदान वाढलेले दिसत आहे. सर्वच मतदारसंघात सुमारे चार टक्के मतदान वाढले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला मिळणार हे आता मतमोजणीच्या दिवशीच समजू शकणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : इन्फ्लूएंझाने होणाऱ्या मृत्यूत वाढ, गतवर्षाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अधिक

अंधेरी पश्चिम आणि वर्सोवामध्ये मतदानाच्या टक्क्यात सर्वाधिक वाढ

पश्चिम उपनगरातील अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरात मतदानाचा टक्का वाढला आहे. वर्सोवामध्ये कमी मतदान झाले असले तरी गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी मतटक्का वाढला आहे. तर अंधेरी पश्चिममध्ये मतदारांची संख्या कमी झाल्यामुळे मतटक्का वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

सर्वात जास्त मतदार असलेल्या चांदिवलीत मतटक्का घटल्याचे दिसत आहे. चांदिवली परिसरात सर्वाधिक साडेचार लाख मतदार आहेत. मात्र या ठिकाणी यावेळी ५०.०७ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेपेक्षा मतदानात घट झाली. चांदिवली मतदारसंघात सात ठिकाणी क्रिटिकल मतदान केंद्रे आहेत. या भागात तुलनेत १० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान होते.

२०१९ च्या तुलनेत कुठे किती वाढ

सर्वाधिक वाढ

अंधेरी पश्चिम – ९.४७ टक्के
गोरेगाव – ८.९८ टक्के
वर्सोवा – ८.८२ टक्के

मतटक्का घटला

अणुशक्तीनगर – १.३० टक्के
चांदिवली – १.६९ टक्के

शहर भागात

माहीम – ५९.०१ टक्के
वडाळा – ५७.६७ टक्के
वरळी – ५३.५३ टक्के
शिवडी – ५५.५२ टक्के
उपनगर भागात
भांडूप – ६१.१२ टक्के
बोरिवली – ६०.५ टक्के
मुलुंड – ६०.४९ टक्के

आणखी वाचा-मालमत्ता कर बुडव्या बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस

सर्वात कमी मतदान

शहर भागात

कुलाबा- ४४.४४ टक्के
मुंबादेवी – ४८.७६ टक्के

उपनगरात

चांदिवली – ५०.०७ टक्के
वर्सोवा – ५१.२ टक्के
मानखुर्द शिवाजी नगर- ५२ टक्के