कर्जत : कर्जत जामखेड मतदार संघामध्ये यावेळी पुणेकरांची मोठी चंगळ झाल्याची आपल्याला पाहावयास मिळाले. या मतदारसंघातील हजारो मतदान पुणे शहर व उपनगरांमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहत आहे. रोजगाराच्या निमित्ताने हे सर्वजण त्या परिसरात गेलेले आहेत. त्यांची विधानसभेसाठी नावे पुणे व कर्जत जामखेड अशा दोन मतदारसंघांमध्ये अनेकांची आहे. मात्र या नागरिकांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान करण्यासाठी प्राधान्य दिल्याची दिसून आले. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या सर्व मतदारांचा जावयासारखा पाहूणचार करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातून जवळपास दहा ते पंधरा हजार मतदार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी आणण्यात आले होते. या सर्व मतदारांचे पुणे येथे जाऊन आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी यापूर्वीच मेळावे घेतले होते. त्यावेळी जेवणाची खास बडदास्त या सर्व मंडळीची ठेवण्यात आली होती. आणि त्याच वेळी मतदानासाठी येण्याचे निमंत्रण देखील या सर्वांना दोनही आमदारांनी दिले होते.

Winner Candidate List Maharashtra Assembly Election Result
Maharashtra Election Winner Candidate List: भाजपाच्या विजयरथाची राज्यव्यापी घोडदौड, महायुतीला बहुमत; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!
23 November Rashi Bhavishya In Marathi
२३ नोव्हेंबर पंचांग: आज कोणाला मिळेल भाग्याची साथ…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Mahim Assembly Election Results 2024 Live Updates in Marathi_ Mahim Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates
Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : अमित ठाकरे पराभूत, राज ठाकरेंना मोठा धक्का
Bjp spreading false propaganda against Rahul Gandhi regarding reservation says nana patole
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचाही पराभव
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
EKnath shinde
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी

आणखी वाचा-रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांची बदनामी केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

मतदानासाठी येताना वाहनाची व्यवस्था त्यासाठी पाच हजार रुपये भाडे. तुम्ही व्यवसाय नोकरी करत असाल तर तुमच्या दर्जाप्रमाणे तुम्हाला प्रत्येक मतासाठी तीन ते चार हजार रुपये देण्यात आले याशिवाय काही जणांची हॉटेलवर राहण्याची व्यवस्था चहा नाष्टा जेवण अशा खास बडदास्त ही ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे स्थानिक मतदारांपेक्षा या निवडणुकीमध्ये पुणेकर कर्जत जामखेडमध्ये भाव खाऊन गेले. विशेष म्हणजे पुणेकरांनी दोन्ही आमदारांच्या पाहुणचाराचा अनेकांनी लाभ घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे.

यावेळी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्हीही प्रमुख उमेदवारांकडून लक्ष्मी दर्शन व जेवणावळी यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी कधीही अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाहुणचार झालेला नव्हता. यामुळे मतदान संपल्यानंतर कार्यकर्ते या पाहुणचाराबद्दलच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करत असल्याचे दिसून येते. यामध्ये अनेक मतदार शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांची कशी वाट पाहत होते याची देखील अनेक किस्से समोर आले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षाही ही निवडणूक लक्ष्मी दर्शनामुळे चांगलीच चर्चेत आली व त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढल्या असल्याची दिसून येते.

आणखी वाचा-Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये विक्रमी असे ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान आज मतदानानंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आमचा आमदार विजयी होणार याविषयी जोरदार दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. तर पत्रकारांना देखील तुमचा काय अंदाज आहे अशा पद्धतीची विचारणा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यातील ज्या अनेक लक्षवेधी विधानसभेच्या लढती आहेत यामध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण ११ उमेदवार असले तरी देखील आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांमध्ये यावेळी मोठी चुरस पहावयास मिळाली.

आणखी वाचा-निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, भाजपाच्या बावनकुळेंपाठोपाठ शिवसेनेचाही दावा; पडद्यामागे चाललंय काय?

प्रचार सभेसाठी मतदार संघात राम शिंदे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरराजे शिंदे , नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, व शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या सभा झाल्या. तर रोहित पवार यांच्यासाठी शरद पवार, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व खासदार निलेश लंके यांच्या सभा झाल्या. या सर्व सभांमुळे वातावरण मतदार संघातील ढवळून निघाले होते. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका या प्रचार सभांमधून केली. यावरून या दोघांमध्ये किती टोकाचा संघर्ष आहे हे मतदारांना दिसून आले. या दोन्हीही आमदारांनी त्यांच्या भाषणांमधून आपल्या कार्यकर्त्यांना आक्रमक करण्याचा जो प्रयत्न केला तो यावेळी चांगलाच यशस्वी झाल्याची दिसून आले.