मुंबई : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, निवडणूक आयोगाकडे परस्परांविरोधात तक्रारी यामुळे एकीकडे राजकीय हवा गरम झाली असताना सूर्यदेखील आग ओकतो आहे. अशा तापलेल्या वातावरणात राज्यातील आठ मतदारसंघांसह देशभरातील ८८ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान होणार आहे. राज्यात एकूण २०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आठापैकी सात मतदारसंघ कायम राखण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर असेल. वाढत्या उकाडय़ात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे खडतर आव्हान राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना पार पाडावे लागणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच तर मराठवाडय़ातील तीन मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी ठाकरे गटाकडे असलेल्या परभणीचा अपवाद वगळता ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या महायुतीसमोर सात जागा कायम राखण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीने भाजप आणि महायुतीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  विदर्भ आणि मराठावाडय़ात वंचित बहुजन आघाडीचा कितपत प्रभाव पडतो यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील. आठही मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत चुरशीच्या लढती होणार आहेत. अकोला मतदारसंघात वंचितचे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा आपले नशीब आजमवित आहेत. तिरंगी लढतीचा या मतदारसंघात कोणाला फायदा होतो याची उत्सुकता असेल. अमरावतीमध्ये महायुतीतच धुसफूस बघायला मिळाली. बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने त्याचा भाजपच्या नवनीत राणा यांना कितपत फटका बसतो का, यावर निकाल अवलंबून असेल. बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम या मतदारसंघांत दोन शिवसेनांमध्ये चुरशीच्या लढती बघायला मिळत आहेत. 

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

हेही वाचा >>>मुंबई, ठाणे, नाशिकचा तिढा अजूनही कायम; राज्यात अखेरच्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

मतदान कुठे?

’बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

’परभणीमध्ये ४७, नांदेडमध्ये २९, हिंगोलीत १५ मतदानकेंद्र्रे संवेदनशील

’अकोला, अमरावती आणि वध्र्यात एकही मतदानकेंद्र संवेदनशील नाही

मतदानाच्या  टक्केवारीची चिंता

विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घसरली होती. कडक उन्हाळा व मतदारांमधील निरुत्साह याचा फटका बसला. विशेषत: नागपूरमधील शहरी भागांत मतदान कमी झाले. चंद्रपूरमध्ये मात्र मतदानात तीन टक्के वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असेल.

Story img Loader