सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची घसरण होऊ लागल्याचे सोमवारी होळीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उघड झाले आहे. शहरातील शिवाजी मैदान परिसरात उत्तर भारतीय नागरिकांच्या एका गटाने होळीचे औचित्य साधत सोमवारी बीभत्स रूप दाखविणाऱ्या संगीतमय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये तंग कपडे परिधान केलेल्या नृत्यांगना आपला कलाविष्कार सादर करत असताना उपस्थित उत्तर भारतीय बेभान झाले होते. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाविषयी कोणालाही फारसे कळू नये, यासाठी आयोजकांनी मैदानाच्या कुंपणावर पडदे लावले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत रविवार सायंकाळपासूनच धुळवड सुरू झाली ती सोमवारी दुपापर्यंत सुरूच होती. शिवाजी मैदानात उत्तर भारतीय नागरिकांच्या एका गटाने आयोजित केलेल्या नृत्याच्या कार्यक्रमात तंग कपडे घातलेल्या नृत्यांगना सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर उपस्थित उत्तर भारतीय बेभान होऊन नाचत होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांवर टीका होऊ लागली आहे. या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तीशिवाय इतर कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. या कार्यक्रमाविषयी स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या कार्यक्रमास भाजपच्या एका माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्याने हजेरी लावली होती. त्याचे फलकही या कार्यक्रमासाठी लावण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader