मुंबई : नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, नवीन अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, वाहनांचा कर, वाहनांवरील बिनबोजा उतरविणे व चढविणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व त्याचे नूतनीकरण, वाहनांना जारी केलेले शुल्क आणि दंड वसुली यातून वडाळा आरटीओला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४८३.७७ कोटी रुपये महसूल मिळाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४५०.२२ कोटी महसूल मिळाला होता. या दोन वर्षांच्या तुलनेत महसुलात सुमारे ७ टक्के म्हणजे ३३.५५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वडाळा आरटीओला दंडात्मक कारवाईकरिता कार्यालयीन कार्यक्षेत्रामध्ये विधीग्राह्य नसलेली अनुज्ञप्ती, बिल्ला (बॅच) धारण न करणे, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, विमा प्रमाणपत्र वैध नसणे, वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध नसणे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक, विना परवाना / अवैध प्रवाशी वाहतूक, विनाआच्छादन माल वाहतूक, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनचालक व मालक यांच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये जारी करावयाच्या प्रकरणांकरीता वार्षिक लक्ष्य १४,४०० प्रकरणे होते. दंडात्मक कारवाई करून तडजोड शुल्क वसुलीचे वार्षिक लक्ष्य म्हणून ४ कोटी ५० लाख देण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
india s industrial production rises 3 1 percent in september
कारखानदारी क्षेत्राचे ऑगस्टमधील उणे स्थितीतून सकारात्मक वळण , सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.१ टक्क्यांची वाढ
loksatta editorial on inflation
किरकोळ महागाई दराने गाठला १४ महिन्यांचा उच्चांक; ऑक्टोबर महिन्यात ६.२१ टक्क्यांची नोंद

हेही वाचा…मुंबई : दर महिन्याला सरोगसीसाठी १० ते १२ जोडप्यांचे अर्ज

तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांकडून तपासणीद्वारे वाहनधारकांकडून एकूण ३ कोटी ७१ लाख रुपये दंडवसुली करण्यात आली. वडाळा आरटीओने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० ऑटोरिक्षा टॅक्सी वाहनांची तपासणी केली. दोषी ३,४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ६१.०५ लाख इतकी तडजोड शुल्क रक्कम वसूल करण्यात आली. तसेच एकूण ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले, असे वडाळा आरटीओ कार्यालयाने सांगण्यात आले.