पालिकेच्या कारवाईनंतर चोवीस तासांत झोपडय़ांची पुन्हा उभारणी

वडाळ्यातील वाढत्या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा मारण्यास सुरुवात केली असली तरी कारवाईनंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत चार बांबू आणि ताडपत्रींच्या आधारे झोपडय़ा पुन्हा उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. तसेच, या परिसरातील वडाळा ब्रिज, काणे नगर, सहकार नगर येथे असलेल्या अनधिकृत झोपडय़ांना अद्याप हातच लावण्यात आलेला नाही. अनधिकृत झोपडय़ा आणि पार्किंगमुळे आता येथील मोनो रेल्वेखालील परिसरही बाधित होऊ लागला आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?

वडाळा आगाराबाहेर टिळक रस्त्यावरील आंबेडकर महाविद्यालयाजवळील बेस्टच्या संरक्षण भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या एफ  उत्तर विभागाकडून ११ ऑगस्टला कारवाई करण्यात आली; परंतु दुसऱ्या दिवशी पहाटे या झोपडय़ा पुन्हा त्याच ठिकाणी उभ्या राहिल्या.

याआधी पालिकेडून या झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली होती. तरी काही दिवसांतच पुन्हा या ठिकाणी झोपडय़ांनी अतिक्रमण केले होते. ११ ऑगस्टची कारवाई बेस्ट प्रशासनाच्या तक्रारीवरून करण्यात आली.

या झोपडय़ा बेस्टच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आहेत, त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना झोपडीधारकांनी केलेल्या घाणीतून वाट काढत कार्यालय गाठावे लागते. तसेच बेस्टचे वीज देयक केंद्रही येथे असल्याने देयक भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांनाही याच त्रासाला सामोरे जावे लागते.

येथे बाजूलाच असलेल्या बेस्टच्या बस स्टॉपवरही अतिक्रमण झाले असल्याने प्रवाशांनाही येथे थांबणे त्रासाचे ठरते, परंतु कारवाईनंतर शुक्रवारी पहाटे झोपडय़ा पुन्हा उभारण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांना दिसून आले.

याशिवाय वडाळा पश्चिमेला अ‍ॅन्टॉप हिल विभागाला जोडणाऱ्या वडाळा पुलावरही प्लास्टिकच्या ताडपत्री टाकून बांधलेल्या कच्च्या झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. यावरही पालिकेच्या एफ  उत्तर विभागाकडून कारवाई करण्यात आली होती आणि पदपथाचे सुशोभीकरण करुन तो पादचाऱ्यांना मोकळा करून देण्यात आला होता, पण पावसाळ्यात पुन्हा एकदा झोपडय़ांनी बस्तान बसविले आहे. पावसाळ्यात झोपडय़ा एकदा उभ्या राहिल्या की त्या कायमच ठाण मांडून राहतात, असा रहिवाशांचा अनुभव आहे.

पश्चिमेला असणाऱ्या सहकार नगर वसाहतीबाहेरही अशाच  झोपडय़ांचे दर्शन होत आहे. गंभीर म्हणजे, टिळक रस्त्याला छेदत जाणाऱ्या जी. डी. आंबेकर रस्त्यावरून मोनो रेल्वेची चेंबूर ते सातरस्ता ह्य़ा प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्याची मार्गिका जाते. या मार्गिकेसाठी बांधण्यात आलेल्या खांबाखालीच झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. खाबांचा आसरा घेत वाहनेदेखील उभी केली जातात. त्यामुळे, मोनोच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्मचाऱ्यांना व ग्राहकांना त्रास होत असल्याने वडाळा आगाराजवळील बेस्ट कार्यालयाबाहेरील झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडूनच पालिकेच्या एफ उत्तर विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु कारवाईनंतर झोपडय़ा पुन्हा उभ्या राहिल्या आहेत.

– मनोज वराडे,उपजनसंपर्क अधिकारी, बेस्ट

वडाळा आगाराबाहेरील झोपडय़ा पुन्हा उभ्या राहिल्या असतील तर लवकरच त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

– एफ उत्तर विभाग, पालिका

Story img Loader