शनिवारची रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या. मुसळधार पावसामुळे चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे एक झाड भिंतीवर पडले आणि मग भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली दबल्यानं १५ जणांना नागरिकांना प्राण गमवावे लागले. मुंबईतील या घटनांत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर बोलताना मुबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली.

Mumbai Local updates : अतिवृष्टीने मुंबईत हाहाकार! रेल्वे सेवेला पावसाने लावला ब्रेक

Baba Siddique lawrence bishnoi
बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचा हत्येपूर्वी बिश्नोईच्या भावाशी संपर्क, पोलीस चौकशीत कबुली; नेमकं काय बोलणं झालेलं?
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Sunil Gavaskar react on Sarfaraz Khan
Sarfaraz Khan : सर्फराझ खानच्या फिटनेसबाबत माजी खेळाडू सुनील गावस्करांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, ‘त्याच्या कंबरेपेक्षा त्याचे…’
Malad Mob Lynching CAse Update
Malad Mob Lynching : मालाडमध्ये जमावाच्या मारहाणीत मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओची पक्षाने घेतली दखल, नेते म्हणाले…
Mumbai, murder MNS worker Mumbai,
मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
Raj Thackeray And Ratan Tata News
Ratan Tata : राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या प्रोजेक्टची रतन टाटांना पडली होती भुरळ, म्हणाले होते…
Ratan Tata Passed Away Ratan Tata Death Harsha goenka Sundar Pichai Tribute tweet
Ratan Tata Death: “घड्याळाची टिकटीक थांबली…” हर्ष गोयंका यांची मन हेलावणारी पोस्ट; पिचाई म्हणाले, ‘भारताला…’

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटना दुर्दैवी असल्याचं सांगत भाष्य केलं. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते, त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं”, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

हेही वाचा- Mumbai Rain : चेंबूरमध्ये दरड कोसळून १५ ठार; तर विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली, ३ जणांचा मृत्यू

“पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरीत केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना क्लेशदायक आहे, पण नागरिकांना हेच आवाहन आहे की लोकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे”, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं.

“ज्यावेळी महापालिका नोटीस देते, त्यावरून राजकीय आखाडे तयार होतात. त्यामुळे लोक ज्यावेळी राजकीय नेत्यांकडे जातात. त्यावेळी इतर राजकीय नेत्यांनीही नागरिकांना समजून सांगितलं पाहिजे. प्रशासन सांगतंय तर त्यांचं ऐका असं लोकप्रतिनिधींनी संबंधित लोकांना सांगितलं पाहिजे”, असं आवाहन पेडणेकर यांनी सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींना केलं आहे.