आरे कॉलनीमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबळ्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावले आहेत. मात्र या शनिवारी संध्याकाळपर्यंत तरी बिबटय़ा पिंजऱ्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरात दहशत आह़े
शाळेतून संध्याकाळी घरी परतत असलेल्या प्रकाश साळुंखे या बारा वर्षांच्या मुलाला बिबटय़ाने ठार मारले. शुक्रवारी ही घटना घडल्यावर त्याच रात्री वनविभागाने त्या ठिकाणी काही अंतरावर दोन पिंजरे लावले आहेत. भक्ष्य ठेवलेल्या या पिंजऱ्याकडे रात्री बिबटय़ा फिरकला नाही, असे वनसंरक्षक अधिकारी अनिल तोरडमल म्हणाले. दोन आठवडय़ांपूर्वी आरे कॉलनीच्या याच भागात चार वर्र्षांच्या मुलीला बिबटय़ाने ठार केले होत़े तर त्याच दिवशी संध्याकाळी बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता. त्या वेळीही या भागात दोन पिंजरे लावण्यात आले होते. मात्र बिबटय़ाला पकडण्यात अपयश आले होते. या वेळी हल्ला केलेला बिबटय़ा तोच असावा़ तो या परिसरात सावजासाठी येत असल्याची शंका वनाधिकाऱ्यांना आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा