केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून रक्तामध्ये मद्य वा अंमलीपदार्थ सापडले नाहीत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
केईएम रुग्णालयातील पीडित महिला डॉक्टर बुधवारी रात्री तळमजल्यावरुन लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर जात होती. त्या वेळी वॉर्डबॉय पोपट भोवरे याने या डॉक्टरचा विनयभंग केला. डॉक्टरने त्यास विरोध केला आणि लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच आरडाओरड केली. लिफ्टमधून पळून जाणाऱ्या पोपटला रुग्णांच्या नातेवाईकांनी पकडले.
डॉक्टर विनयभंगप्रकरणी वॉर्डबॉयला न्यायालयीन कोठडी
केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
First published on: 13-12-2014 at 04:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ward boy molests kem doctor in hospital lift sent in police custody