राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत आज मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला असून त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या आरक्षण सोडतीमध्ये काही नगरसेवकांना धक्का बसला आहे. तर काही नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचं वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण झाला आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा ११७ क्रमांकाचा वॉर्ड सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यासाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभागदेखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे.

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड- ८५, १०७, ११९, १३९, १६५, १९०, १९५, २०४ हे वॉर्ड अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या वॉर्डमधून निवडणूक लढवणाऱ्या पुरुष उमेदवारांना दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव वॉर्ड- ६०, १५३, १५७, १६२, २०८, २१५, २२१

अनुसूचित जमातीसाठी राखीव वॉर्ड- ५५

अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव वॉर्ड१२४

>>> मुंबईची एकूण लोकसंख्या- १२४४२३७३
>>> अनुसूचित जाती- ८०३२३६
>>> अनुसूचित जमाती- १२९६५३
>>> सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता एकूण २३६ सदस्य