मुंबई: अरबी समुद्रात खोलवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून गेल्या तीन तासांत चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असून. चक्रीवादळाची तीव्रता पुढील १२ तासांत वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबई तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारीसाठी जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग: महामार्गाचा सविस्तर आराखडा तयार कण्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लगाराची नियुक्ती
पुढील २४ तासांत उत्तरेच्या दिशेने चक्रीवादळ पुढे सरकेल. पूर्वमध्य अरबी समुद्र आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात सध्या ही परिस्थिती आहे. हे वादळ मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती पुण्याचे हवामान विभाग प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. या चक्रीवादळला बिपरजॉय असे नाव देण्यात आले आहे.