‘सिडको’मध्ये काही अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या असून, प्रशासनाने अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. रामनाथ म्हात्रे या ‘सिडको’ कर्मचाऱ्याने साडेबारा टक्के भूखंड या योजनेत नाव घुसविण्यासाठी आरोपीकडून तीन लाख रुपये घेतले होते. याशिवाय आणखी २० लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. तरीही भूखंड देण्यास म्हात्रे यांनी टाळाटाळ केली होती. यामुळेच आरोपीने म्हात्रे यांचे अपहरण करून हत्या केल्याची माहिती पाटील यांनी राष्ट्रवादीचे मिलिंद कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी पळून गेल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in