वर्सोवा येथील रुबीना फर्नाडिस या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच इमारतीच्या वॉचमन आणि सफाई कामगाराला अटक केली आहे. बुधवारी सकाळी या दोघांनी चोरीच्या उद्देशाने फर्नाडिस यांची हत्या केली होती. विशाल सिंग (२०) आणि शिवकुमार राजपूत (२०) अशी या दोघांची नावे आहेत. शिवकुमार हा वॉचमन असून विशाल याच इमारतीत सफाई कामगार आहे. रुबीन फर्नाडिस या वर्सोवा येथील वर्सोवा मच्छीमार सोसायटीत पतीसह राहत होत्या. बुधवारी सकाळी १० वाजता फर्नाडिस यांचा पती बाहेर गेल्यानंतर या दोघांनी घरात घुसून त्यांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांनी घरातील दीड लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. या दोघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.   

Story img Loader