धुळवडीदरम्यान अनोळखी पादचाऱ्यांना फुगे मारण्याचे प्रकार यंदा चांगलेच महागात पडणार आहेत.  अशी आगळीक करणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्यात डांबले जाणार आहे. गेल्या काही वर्षांत धुळवडीदरम्यान घडलेल्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फुग्यांऐवजी फक्त गुलालाची उधळण करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपल्या परिसरातच होळी खेळा. इतरांची तक्रार येऊ देऊ नका. तशी तक्रार आली तर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.होळी आणि रंगपंचमीनिमित्त रस्त्यावरून जाणाऱ्यांना फुगे मारणाऱ्याविरुद्ध पोलिसांकडून विशेष मोहीम उघडली जाणार आहे. साध्या वेशातील पोलीस अशा व्यक्तींना जेरबंद करून पोलीस ठाण्यात आणणार आहेत. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा १५१ अन्वये २४ तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याची शिक्षा केली जाणार आहे. फुग्यामुळे कुणाला इजा झाल्यास संबंधिताला दखलपात्र गुन्ह्य़ाखाली अटक केली जाणार आहे.

Story img Loader