मुंबई: मुंबईकरांवरील संभाव्य पाणीकपात तुर्तास टळली आहे. भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा सध्या ४३ टक्के असून राज्य सरकारने राखीव साठा मंजूर केल्यामुळे त्यात आता वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात १ मार्चपासून प्रस्तावित करण्यात आलेली पाणीकपात टळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात सध्या केवळ ४३.१६ टक्के पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आहे. हा साठा पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवून केली होती. मात्र दहा दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारने याबाबत काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे १ मार्चपासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र राखीव साठा देण्यास राज्य सरकारने मंजूरी दिल्यामुळे आता पाणी कपात होणार नाही, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री

१५ तारखेपर्यंतची कपात कायम

दरम्यान, ही पाणी कपात टळलेली असली तरी पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सध्या १५ टक्के पाणी कपात सुरू आहे. येत्या ५ मार्चपर्यंत ती कायम राहणार आहे. पिसे उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागले आहेत. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास ५ मार्चपर्यंत वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ६ लाख २४ हजार ६२७ दशलक्षलीटर म्हणजेच ४३.१६ टक्के पाणीसाठा आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cuts avoided approval of the state government to provide reserve stock mumbai print news amy
Show comments