मुंबई : मुंबईत बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका मेट्रो प्रवाशांनाही बसला. ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकात गळती झाली. त्यामुळे स्थानकात पाणी साचले होते. याबाबतची माहिती मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (‘एमएमआरडीए’) आणि मेट्रो मार्गिकांच्या संचलन – देखभालीची जबाबदारी असलेल्या महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या (‘एमएमएमओसीएल’) अधिकाऱ्यांनी तात्काळ जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकात धाव घेऊन पाहणी केली. आवश्यक त्या उपाययोजना करून रात्रीच गळती थांबविल्याची माहिती ‘एमएमओसीएल’ने दिली. वाहिनीमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही. त्यामुळे गळती झाल्याचेही स्पष्टीकरण ‘एमएमएमओसीएल’ने दिले.

हेही वाचा >>> लंडनमधील पोलीस असल्याचे भासवून सायबर फसवणुकीचा प्रयत्न; ६० हजार रुपये गोठवण्यात पोलिसांना यश

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
liquor ban Nandurbar loksatta
नंदुरबार जिल्ह्यातील गावात दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर बाटली झाली आडवी
Increase in water supply to Thane Bhiwandi Mira Bhainder
दिड वर्षात ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरला वाढीव पाणी; स्टेम प्राधिकरणाकडून पाणी उचल क्षमता वाढविण्याच्या कामास सुरूवात

‘एमएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ अ’ मार्गिका २०२२ पासून सेवेत दाखल आहेत. या मार्गिकेवरून दररोज अंदाजे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प मानला जातो. मात्र पावसाळ्यात मेट्रो स्थानकात अनेकदा गळती होताना निदर्शनास येते. काही दिवसांपूर्वी ‘दहिसर पश्चिम – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अंधेरी पश्चिम आणि गोरेगाव मेट्रो स्थानकांमध्ये गळती झाली होती. यावरून समाज माध्यमावर बरीच टीका झाली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असलेल्या मेट्रो मार्गिकेतील या दोन मेट्रो स्थानकांमध्ये गळती होत असलेल्या ठिकाणी चक्क रंगीबेरंगी बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. समाज माध्यमावरील टीकेनंतर याची तात्काळ दखल घेत ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएमएमओसीएल’ने आवश्यक ती दुरूस्ती केली. असे असताना आता काही दिवसांतच पुन्हा मेट्रो मार्गिकेवरील स्थानकात गळती झाल्याचे निदर्शनास आले. ‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकात बुधवारी पावसामुळे गळती झाली. या गळतीची एक चित्रफित समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली. त्यामुळे पुन्हा टीका होऊ लागली.

हेही वाचा >>> १.४५ टन प्लास्टिक जप्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्थानकातील या गळतीची माहिती मिळताच रात्री उशीरा अधिकाऱ्यांनी धाव घेत स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करून गळती रोखण्यात आल्याची माहिती ‘एमएमएमओसीएल’कडून देण्यात आली. स्थानकातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये कचरा अडकल्याने वा पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने गळती झाल्याचे निदर्शनास आले, असे ‘एमएमएमओसीएल’कडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकाराची महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी गंभीर दखल घेत जोगेश्वरी पूर्व स्थानकच नव्हे तर सर्व मेट्रो स्थानकांची तपासणी करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पाणी गळती होऊ नये वा इतर कोणत्याही समस्या मेट्रो स्थानक परिसरात, मेट्रो मार्गिकेत निर्माण होऊ नयेत यासाठीची आवश्यक ती काळजी घेण्याचेही आदेश संबंधितांना दिले आहेत.

Story img Loader