मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत शुक्रवारी ७९.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठा वाढलेला असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ७९.२५ टक्के आहे. पाणीसाठा वाढला असला तरी सध्या लागू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने अद्याप जाहीर केलेला नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्याचा आढावा घेऊन कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार लवकरच कपात रद्द होण्याची शक्यता आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

हेही वाचा >>> मुंबई-गोवा महामार्गाची भीषण अवस्था! युट्युबर जीवन कदमने दाखवलं सत्य, म्हणाला, “गाडीचा टायर भररस्त्यात…”

मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी ही चार धरणे ओसंडून वाहू लागल्यामुळे व मध्य वैतरणा धरण ९६ टक्के भरल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन पाणी कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. आता पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणांमधून सर्वात जास्त पाणीपुरवठा करण्यात येत असून या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भातसा धरणात ७२ टक्के, तर ऊर्ध्व वैतरणा धरणात ५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असला तरी जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे पाणी पातळी वाढत आहे.

हेही वाचा >>> मुंबईत ‘बेस्ट’चे कामबंद आंदोलन; मनसेचा थेट सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “तुमची ट्रिपल शक्ती…”

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.  सातही धरणांतील पाणीसाठा १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. सध्या पाणीसाठ्यात २० टक्के तूट आहे.

दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा

४ ऑगस्ट २०२३….. ११ लाख ४७ हजार ०८६ दशलक्ष लिटर….. ७९.२५ टक्के

४ ऑगस्ट २०२२……  १२ लाख ८८ हजार ५२४  दशलक्ष लिटर…… ८९.०३ टक्के

४ ऑगस्ट २०२१…… ११ लाख ३७ हजार ५४३ दशलक्ष लिटर……. ७८.५९  टक्के

Story img Loader