मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. दरवर्षी मुंबईत पाणी साचण्यावरुन राजकारण तापताना दिसतं. यंदाही पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत पाणी साचल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रशासनावर टीका केली आहे. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी एक शेर ट्विट केला आहे. या शहरात प्रत्येक वळणावर खड्डे आणि तलाव सापडतील असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. “इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब, पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,
पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !#MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai pic.twitter.com/zlrunfCwmR— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 16, 2021
अमृता फडणवीस यांनी बघितलं तर या शहरात प्रत्येक वळणावर पाणी साचलेले खड्डे दिसतील, पण शोधायला गेलं एकही गुन्हेगार सापडणार नाही असे म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी या ट्विटसोबत एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये उभ्या असून त्यांनी जमिनिकडे अंगठा करत प्रशासन अपयशी झाल्याचे दर्शवले आहे.
रात्रभर पाऊस पडल्याने मुंबईची झाली ‘तुंबई’… हार्बर, मध्य रेल्वे ठप्प; रस्ते वाहतुकीवरही परिणाम
दरम्यान याआधीही पहिल्या पावसातचं मुंबई तुंबल्यानंतर अमृता फडणवीस यांनी मुंबई उपगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यंदा मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. त्याचबरोबर शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेकडून नालेसफाई करण्यात आल्याचं म्हटलं होतं. मात्र पहिल्या पावसानेच मुंबईला वेठीस धरलं. मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला होता.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रशासनावर टीका केली होती. अमृता फडणवीस यांनी एक शेर ट्विट केला होता. “जी तोंडापर्यंत उडत होती, आता पायांना चिकटली आहे. पाऊस पडताच मातीची नियत बदलून गेली,” अशा आशयचा शेर अमृता फडणवीस यांनी ट्विट केला होता.