मोसमी पावसाच्या चार महिन्यात देशभरात एकूण सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा झाला आहे. मात्र तरीही १८७ जिल्ह्यात पावसाची तूट असल्याचे दिसून येते. हवामान बदलाच्या परिणामामुळे देशभरातील मोसमी पावसाचे स्वरूप बदलताना दिसून येत आहे. येत्या काही वर्षांतही पावसाचे रूप हे यावर्षीप्रमाणे असण्याची शक्यता आहे, असे क्लायमेट ट्रेंडच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- दिवाळीत खासगी बस प्रवास महागला; मुंबई-नागपूर वातानुकूलित प्रवासासाठी चार हजार रुपये

यंदा देशात सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. प्रशांत महासागरातील ‘ला निना’ परिस्थितीमुळे अतिरिक्त पाऊस झाला. बंगालच्या उपसागरातील हवामानाच्या स्थितीमुळे देशाच्या विविध भागात जुलै महिन्यापासून चांगला पाऊस पडला. देशात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८७० मिमी पावसाच्या तुलनेत ९२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, देशातील १८७ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदवली असून यापैकी सात जिल्ह्यांमध्ये अधिक तूट आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा २२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारतात १८ टक्क्यांची तूट आहे.

हेही वाचा- ‘लम्पी’ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश द्या; राजू शेट्टी यांची उच्च न्यायालयात याचिका

यंदा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोसमी पावसाने इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशाच्या पारंपारिक मार्गाऐवजी मध्य भारतातून प्रवास केला. परिणामी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांत या हंगामात जास्त पावसाची नोंद झाली. एरवी यापैकी बहुतेक प्रदेशांत मुसळधार पाऊस पडत नाही, असे क्लायमेट ट्रेंडच्या अहवालात स्पष्ट केले आहे.हवामानाच्या बदलामुळे मोसमी पावसाचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांतही मोसमी पावसाचा कल बदललेला दिसून येणार आहे, अशी माहिती क्लायमेट चेंजचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली.

हेही वाचा- ‘झोपु प्रकल्पांच्या संयुक्त तपासणीला विरोध नाही’; न्यायालयाने फटकरल्यानंतर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण

एका भागात पूर येणे आणि इतर भागांमध्ये पावसाची कमतरता दिसून येत आहे. पावसाचे बदलेले स्वरूप समजणे आणि मोसमी पाऊस उशिरा येण्याची कारणे समजून घेणे खूप कठिण आहे. त्यासाठी बरेच संशोधन करणे आवश्यक आहे, अशी माहिती सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्चचे कार्यकारी संचालक डॉ. आर कृष्णन यांनी दिली.

हेही वाचा- चार वर्षापासून राज्य मुख्य नियंत्रण कक्ष कागदावरच; पॅनिक बटन, व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अद्याप कार्यरत नाही

पाऊसभान

जून – या महिन्यात देशात सामान्यतः १६५.३ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा १५२.३ मिमी पावसाची नोंद झाली. मोसमी पावसाचा प्रवास सुरुवातीला संथ गतीने झाल्यामुळे जूनच्या सुरुवातीला देशात ८ टक्के पावसाची तूट होती.

जुलै – या महिन्यात देशात सामान्यतः २८०.५ मिमी पावसाची नोंद होते. तर, यंदा ३२७.७ मिमी पावसाची नोंद झाली. मोसमी पाऊस जुलैमध्ये सर्वाधिक बरसला. देशात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस झाला.

ऑगस्ट – या महिन्यात देशात सामान्यतः २५४.९ मिमी पावसाची नोंद होते. यंदा २६३.७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा फक्त ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

सप्टेंबर – या महिन्यात देशात सामान्यतः १६७.९ मिमी पावसाची नोंद होते. यंदा १८१.३ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

Story img Loader