मुंबई : महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन येथील ६०० इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जीर्ण झाली आहे. महापालिकेने संबंधित जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या मंगळवारी जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणास्तव ‘एच पूर्व’ विभागातील वांद्रे – कुर्ला संकूल परिसरात मंगळवारी सायंकाळी ५ ते ७.३० या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
संबंधित जलवाहिनीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा खंडित कालावधीत काटकसरीने पाणी वापर करावा. तसेच पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.