येत्या बुधवार आणि गुरुवारी १७ व १८ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईत बहुतांशी भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. चर्चगेटपासून मशीद बंदर, भायखळा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून जे जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बंद करुन या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या कालावधीत ए (चर्चगेट, कुलाबा), बी (मशीद बंदर,डोंगरी) आणि ई (भायखळा, माझगाव) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय

हेही वाचा >>> नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत ९२ गुन्हे दाखल; ५७ जणांना अटक, मांजामुळे एकाचा अपघात

कुठे पाणी बंद

ए विभाग …..नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत

ई विभाग ……नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण …..१८ जानेवारी २०२४ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.

डॉकयार्ड रोड, हातीबाग मार्ग, मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, रे रोड, मध्य रेल्वे यार्ड, वाडी बंदर, उमरखाडी, वालपाखाडी,नूरबाग, डोंगरी या सर्व विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.