मुंबई: मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत सूक्ष्म बोगद्याचे काम सुरू असताना १७ मार्च २०२५ रोजी मुलुंड पूर्व येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस हरी ओम् नगर व म्हाडा कॉलनी मध्ये असलेल्या नाल्याच्या तळाला हानी पोहोचली. त्यामुळे जलवाहिनीस मोठ्या प्रमाणावर गळती होऊ  लागली. त्यामुळे १८ मार्च २०२५ रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत येथील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही.सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्यामार्फत हाती घेण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्ती काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १२ ते १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे खालील नमूद भागात १८ मार्च २०२५ रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही.

पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर

-टी विभाग
-मुलुंड पूर्व – पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्वेकडील भाग, म्हाडा वसाहत , हरी ओम् नगर
-मुलुंड पूर्व – पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडील भाग ते मुलुंड स्टेशन पर्यंतचा परिसर

Story img Loader