लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : कांदिवली ते दहिसर भागात उद्या मंगळवारी पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आजच अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा लागणार आहे. दहिसरमधील पाणी पुरवठ्यावर जास्त परिणाम होणार आहे. तसेच पुढील दोन दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ ची संरचनात्मक तपासणी मंगळवारी ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे. या कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या आर / दक्षिण, आर / मध्य व आर / उत्तर या विभागात म्हणजे कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

आणखी वाचा-खारघर दुर्घटना अहवाल १० महिन्यांनंतरही गुलदस्त्यातच!

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सोमवारीच पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा तसेच ९ जानेवारी रोजी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे, म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असेही आवाहन पालिकेने केले आहे.

कोणत्या भागात पाणी पुरवठा कमी दाबाने

१) कांदिवली (आर / दक्षिण) –

महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व समता नगर-सरोवा संकुल, कांदिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५)

२) बोरिवली (आर / मध्य )-

ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०)

३) दहिसर (आर / उत्तर)-

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदीर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४० ते सायंकाळी ७.४०)

आणखी वाचा-मुंबई महापालिकेचे उत्पन्न घटणार, ६००० कोटींवरून ४६०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित

४) दहिसर (आर / उत्तर)-

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.४५ ते रात्री ११.३०)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply in kandivali to dahisar area tomorrow with low pressure mumbai print news mrj