मुंबई : रूरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापकांमार्फत येत्या ३ व ४ जून रोजी मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करण्यात येणार आहे. ३, ४ जूनदरम्यान होणाऱ्या पाहणी कालावधीत महापालिकेच्या ए, सी, डी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांतील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेकडून लवकरच मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मलबार हिल जलाशयाच्या कामाचे पुनर्विलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या आधीच्या विशेषज्ञ समितीने प्रस्तुत केलेल्या अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी आणि मलबार टेकडी जलाशयातून मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा बाधित न करता जलाशयाचे काम पूर्ण करण्याकरता योग्य कार्यपद्धती सुचविण्यासाठी महानगरपालिकेने रूरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी) या स्थापत्य अभियांत्रिकीतील मान्यताप्राप्त संस्थेची नियुक्ती केली आहे. त्या अनुषंगाने मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करणे आवश्यक आहे. मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी ३ व ४ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण विभागांतील काही परिसरांतील पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे.

हेही वाचा…अकरावी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालय पसंतीक्रमाचा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून भरता येणार

या कामामुळे काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. पाणी कपातीदरम्यान, जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसेच, पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या भागात पाणीकपात लागू करणार

ए विभाग – (३ जून रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत) कफ परेड व आंबेडकर नगर (११.२० ते दुपारी १.४५ ), नरिमन पॉईंट व जी. डी. सोमाणी (१.४५ ते दुपारी ३, पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात), मिलीटरी झोन (पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात)

सी विभाग – (३ जून रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत) मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)

हेही वाचा…ठाण्यात ८ आणि ९ जून रोजी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’, नवनवीन अभ्यासक्रम व करिअरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

डी विभाग – (३ जून रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत) पेडर रोड (दुपारी १ ते रात्री १०.३०, पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात), मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)

हेही वाचा…मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द, ३३ लाख प्रवाशांचे अतोनात हाल; ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक

जी उत्तर व जी दक्षिण विभाग – (३ जून रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत) जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणी पुरवठा होणारे सर्व विभाग (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply in south mumbai to be reduced on 3 to 4 june for malabar hill reservoir inspection mumbai print news psg