मुंबई : येत्या सोमवारी अंधेरी, जोगेश्वरी परिसरात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेरावली जलाशय येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन; नवीन चित्रपट नसल्याने चार जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित

हेही वाचा – क्रिकेट मंडळावरील ‘कृपादृष्टी’वर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातर्फे वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचे काम सोमवारी २ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या १२ तासांच्या कालावधीत म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागातील काही विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Story img Loader