मुंबई : कुर्ला परिसरात  दर शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दहा दिवस चालणार असून हे काम प्रत्येक शनिवारी केले जाणार आहे. त्यामुळे ११ मार्च रोजी पाणीपुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.  ६ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी कुर्ला परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कुर्ला परिसरातील नागरिकांनी दर रविवारी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुर्ला येथील खैरानी रोडखाली असलेल्या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिर या दरम्यानच्या जलवाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम पालिकेच्या जलअभियंता विभागाने हाती घेतले आहे. या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार असल्याने व सलग १० दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होवू शकते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे काम टप्प्याटप्प्याने सलग १० शुक्रवार – शनिवारी करण्यात येणार आहे. यामुळे शनिवार,  ४ मार्च २०२३ ते शनिवार, ६ मे २०२३ या कालावधीदरम्यान प्रत्येक शनिवारी ‘एल’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे.

raj thackeray rally in thane
सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे ४८ तासात उतरवेन ; राज ठाकरे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
work of Gavhan station is incomplete
गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

हेही वाचा >>> करोना केंद्र कथित गैरव्यवहार : महापालिकेच्या सहआयुक्ताची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

या कालावधीतील कुर्ला परिसरातीली नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी येणारे पाणी गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे. गेल्या शनिवारी या कामाची सुरुवात झाली होती व ४ मार्च रोजी सदर परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. आता शनिवार, ११ मार्च रोजी कुर्ला परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.  ‘एल’ विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आझाद मार्केट या परिसरांमध्ये शनिवार, ६ मेपर्यंत सलग नऊ शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.