मुंबई : जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे या आठवड्यात गुरुवारी रात्रीपासून कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना बुधवारीच पाण्याचा साठा करावा लागणार आहे.
मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनदरम्यान नवीन जोडरस्त्यालगतची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत गुरुवार, २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून २४ तासांसाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
हेही वाचा…मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप
आर दक्षिण विभागातील मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनदरम्यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जीर्ण झाली असून ती बदलण्यात येणार आहे. नव्या जलवाहिनीमुळे भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होईल आणि पाण्याचा दाब वाढण्यास मदत होईल. त्यामुळे कांदिवली पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
जलवाहिनी जोडणी कामांमुळे या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
१) जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील
२) लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव – ३ मे २०२४ रोजी पाणीपुरवठा बंद
३) म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम) – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.
हेही वाचा…मुंबईतील ११ हजार घरांची एप्रिलमध्ये विक्री, मार्चच्या तुलनेत घर विक्रीत घट
४) चारकोप म्हाडा (सेक्टर – ०१ ते ०९) – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.