मुंबई : दक्षिण मुंबईतील बहुतांशी भागात १७ आणि १८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांमध्ये बुधवारी संध्याकाळी पाणी येणार नाही, तर काही भागांमध्ये गुरुवारी सकाळी पाणी येणार नाही. कुलाबा, भायखळा, आग्रीपाडा भागात उद्या पाणी येणार नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आजच पाण्याचा साठा करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईत बहुतांशी भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. चर्चगेटपासून मशीद बंदर, भायखळा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणपुरवठा बंद राहणार असून जे जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई : खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे धोरण नसताना उच्चभ्रूवस्तीत पंचतारांकित उपाहारगृहाचा ट्रक

मुंबई महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथील जुनी १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बंद करून या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवारी सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरू झाले आहे. हे काम २४ तास चालणार आहे.  या कामाच्या कालावधीत ए (चर्चगेट, कुलाबा), बी (मशीद बंदर,डोंगरी) आणि ई (भायखळा, माझगाव) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणपुरवठा होणार आहे.

हेही वाचा >>>वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नियमावली जाहीर; तातडीने अंमलबजावणी करणार

उद्या कुठे  कुठे पाणी बंद

ए विभाग

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय – सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत

ई विभाग

नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) – ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply will remain off in most areas of south mumbai on january 17 and 18 mumbai print news amy