लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: पूर्व उपनगरांतील काही भागात येत्या गुरुवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयाच्या दुरुस्तीच्या कामामुळे गोवंडी, देवनार, मानखुर्द, चेंबूर येथील पाणीपुरवठा गुरुवार, २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
IRCTC website was down from Thursday morning make trouble for traveller
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद, प्रवाशांना मनस्ताप
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट

ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ ची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे झाल्यानंतर ‘कप्पा क्रमांक १’मध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरणा करण्याचे काम २४ आणि २५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार, २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खालील विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

‘एम पूर्व’ विभाग – रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, मंडाळा, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजी नगर रोड क्रमांक १ ते ६, बैंगणवाडी रोड क्रमांक ७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार मनपा कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय, एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्ता नगर, बालाजी मंदिर रोड, एस. पी. पी. एल. इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस .डी. मार्गाजवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बी. ए. आर. सी. नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाळा गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी. वसाहत, गौतम नगर, पांजरपोळ. तसेच ‘एम पश्चिम’ विभागातील पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, हेमू कलाणी मार्ग, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी मार्ग, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौक, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर या परिसरांमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

या परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Story img Loader