गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयार आणि सक्षम आहोत. येत्या काळात या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, असे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबर आणखी कुठलीही हिंसाचाराची घटना घडू नये यासाठी अद्याप घटनास्थळाजवळ पोलिसांची कारवाई सुरुच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


जैस्वाल म्हणाले, हा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असे म्हणता येणार नाही. हा अचानक झालेला भ्याड हल्ला आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे, त्यामुळे संध्याकाळपर्यंत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.